सामाजिक

धामणीच्या खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना; ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला!

1011272574

नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

धामणी, ता. आंबेगाव : पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांतील भाविकांचे कुलदैवत असलेल्या धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात रविवार (दि. ११ ऑक्टोबर) रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. स्वयंभू सप्तशिवलिंग तसेच खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या उत्सवमूर्तींसमोर विधिवत घटस्थापना करण्यात आली. ‘सदानंदाचा येळकोट’, ‘जय मल्हार’च्या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या उधळणीने मंदिर परिसर भक्तिमय झाला.

1011272578

रविवारी पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृत व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सप्तशिवलिंगावर खंडोबा, म्हाळसा व बाणाई यांच्या सर्वांगसुंदर व लोभस पंचधातूच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

यानंतर गाभाऱ्यातील पूर्वमुखी खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या तसेच उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या देखण्या मूर्तींना वस्त्रालंकार घालण्यात आले. पहाटे सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत यांच्यासह ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा व आरती करण्यात आली.

1011272648

त्यानंतर गाभाऱ्यातील स्वयंभू सप्तशिवलिंगासमोर नवरात्रोत्सवाच्या घटाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘सदानंदाचा येळकोट’, ‘जय मल्हार’च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करून धार्मिक विधी पार पडले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेच्या घटाला नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली, तसेच दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनाकरिता खुले करण्यात आले.

यावेळी धामणी, लोणी, खडकवाडी, गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, संविदणे, कवठे, अवसरी खुर्द आणि तळेगाव ढमढेरे आदी गावांतील मोठ्या संख्येने भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. नवरात्रोत्सवानिमित्त खंडोबा देवस्थानाच्या दोन्ही महाद्वारांवर, मंदिराच्या शिखरावर तसेच मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

1011251237
1011236996

Related posts

चांडोली बुद्रुक येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात !!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथे रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल सजले !!

Chief Editor

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

Chief Editor

Leave a Comment