सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘उत्सव विचारांचा, जागर स्त्रीशक्तीचा’ उपक्रम !!

1011295889
1011295889

स्त्रीशक्तीचा सन्मान विचारांत आणि कृतीत प्रतिबिंबित व्हावा – स्नेहलताई शेळके

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ‘उत्सव विचारांचा, जागर स्त्रीशक्तीचा’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. स्नेहलताई शेळके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

स्त्रीशक्तीचा सन्मान हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या विचारांत आणि कृतीत प्रतिबिंबित व्हावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची व्याख्याने, प्रश्नमंजुषा स्पर्धा, थाळी सजावट, रांगोळी स्पर्धा, पत्रलेखन आणि पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यावेळी समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य ऐश्वर्या गटकळ, स्नेहा शेगर, दिपाली गायकवाड, स्वप्नाली घुले, ज्योती दांगट, प्रतीक्षा भोर, प्रिया सुपेकर, तेजस्विनी कुमकर, संपदा निमसे, दिपाली गडगे, सुचिता साबळे, जयश्री रहाणे, रश्मी चव्हाण, वैष्णवी भुतांबरे, कल्याणी दरेकर, संगीता रिठे, हर्षदा गोफणे आणि प्राची पडवळ यांच्यासह संकुलातील विविध विभागांतील महिला कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबन याविषयी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता रिठे यांनी केले, तर स्नेहा शेगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1011251411

Related posts

पोलीस पाटील यांची पत्रकाराला कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी,गुन्हा दाखल;अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; श्रीतेज पिंगळेची इस्रो निवडीत भरारी!

Chief Editor

विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Chief Editor

Leave a Comment