सामाजिक

लोणीत मध्यरात्री चोरांनी मारला डल्ला, सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला !!

1010447223
1010447227

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव ) येथील सावता मळा येथे सोमवार (दि.०३) रोजी मध्यरात्री बाळू गंगाराम लोखंडे यांच्या बंदिस्त घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार ग्रॅम सोन्याची दोन पाने,४८ सोन्याचे मनी, २५००/ रुपये रोख रक्कम घेऊून पोबारा केला. अंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. यावेळी त्यांनी घरातील पेट्या दोनशे मीटर अंतरावर नेऊन त्यातील वस्तू अस्तावेस्त केल्या व पेट्या तेथेच टाकून दिल्या. पहाटे पाच वाजता उठल्यावर लोखंडे यांना चोरीचा प्रकार कळला.

या संदर्भात समजलेली माहिती अशी कि,बाळू गंगाराम लोखंड हे आपले घराला कुलूप लावून शेजारच्या खोलीत झोपले होते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी येथे डल्ला मारला. याच वेळेस वरचा गलठा वस्ती येथे कौसाबाई सखाराम गायकवाड यांच्या घराची कडी कोंड्या तोडून अंदाजे सव्वा तोळे सोने चोरील गेले. या घटतेची माहिती पारगाव कारखाना पोलिसांना समजताच घटनास्थळी संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे हे पोलीस कर्मचारी दाखल झाले.त्यांनी पंचनामा केला. पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related posts

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या वितरिका झाडांच्या गर्दीत झाल्या गायब!!

Chief Editor

निवेदन क्षेत्रातील कोहिनूर श्री. मयूर संभाजी सरडे

Chief Editor

लोणी (धामणी ) गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड !!

Chief Editor

Leave a Comment