
पंचनामा प्रतिनिधी – वाळुंजनगर (ता. आंबेगाव ) येथे गेली कित्येक दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार(दि.०३) रोजी दिवसा ढवळ्या दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास वाळुंजनगर येथील डिंभा उजव्या कालव्याच्या कडेला पोखरकर-पासूडीवस्ती जवळ बारकू अनंथा ठोंबरे यांच्या एका मेंढीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुसऱ्या घटनेत येथून जवळच रानमळा येथे मारुती सिनलकर यांचा कुत्रा बिबट्याने फस्त केला. या परिसरात अनेक वेळा बिबटया डिंभा उजव्या कालव्याच्या कडेला दबा धरून शिकार शोधत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न असतो.त्यामुळे बिबटयाच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने येथे पिंजरा लावावा अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गेनभाऊ वाळुंज, सरपंच तृप्ती महेंद्र वाळुंज व माजी सरपंच जालिंधर वाळुंज यांनी केली आहे.या संदर्भात वनविभागाने तात्काळ पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.बिबटचा दिसला तर त्वरीत वनविभागला कळविण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. असे असले तरी एखादी मोठी घटना घडण्याची वाट वनविभागाने पाहू नये.अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.





