सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

1009603202

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिप्लोमा प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ‘प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले असून, या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल कपिले यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली समर्थ पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध शैक्षणिक, तांत्रिक व करिअराभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने विशेष प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत २२ जून असून, या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना शाखा निवड, ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेनुसार व आवडीनुसार योग्य शाखेची निवड करून भविष्यातील करिअरची भक्कम पायाभरणी करावी, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रवेश समन्वयक प्रा. संजय कंधारे यांनी सांगितले.
समर्थ पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग या अत्याधुनिक व रोजगाराभिमुख शाखांमध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.

सदर विद्यार्थी सुविधा केंद्र प्राचार्य डॉ. अनिल कपिले व उपप्राचार्य प्रा. संजय कंधारे प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. श्याम फुलपगारे, शैक्षणिक समन्वयक प्रा. स्वप्नील नवले यांच्या नेतृत्वाखाली प्रिया सुपेकर, रूपाली हर्दे,साक्षी जाधव,दिपाली पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यात येत आहे. एकाच ठिकाणी प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती, मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी व पालकांकडून या सुविधा केंद्राचे विशेष स्वागत होत आहे.

fb img 1774661444136

Related posts

मा.मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा !!

Chief Editor

पंचनामा विशेष – अष्टपैलू तमाशा कलावंत राधाकृष्ण राहूरीकर !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

Chief Editor

Leave a Comment