‘

ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पहिल्या पुस्तकाच्या अपूर्व यशानंतर ‘शिवनेरीचे वैभव’ हे माझे दुसरे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा सत्वगुणांचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे उपकार ही शिवजन्मभूमी कधीही विसरणार नाही. स्वराज्याच्या स्वप्नाचा पवित्र पाया असलेला किल्ले ‘शिवनेरी’ प्रेरणा आणि स्वाभिमानाचा दिपस्तंभ आहे. आपल्या स्वतःच्या पुत्रापेक्षा मराठी मुलुखाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंनी संस्कार, स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवून या जुन्नरच्या भूमीला शतकानुशतके पुनीत केले आहे. शिवनेरीच्या शिखरावर उभे राहून दूरवर पसरलेल्या भूमीकडे पाहताना… या मातीतून प्रेरणा घेऊन अनेकांनी निस्वार्थ सेवेने, त्यागाने आणि संघर्षमय कार्याने समाजमनावर अमीट छाप सोडली आहे. समाजाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आणि माणुसकी व समाजसेवा हाच ज्यांच्या जीवनाचा श्वास राहिला अशी विविध क्षेत्रातील अनेक असामान्य व्यक्तिमत्त्व या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील गावागावाने पाहिली आहेत.
स्तंभलेखक संजय नलावडे यांनी रेखाटलेल्या अशाच एकोणतीस व्यक्तीचित्रणांचा माहितीपूर्ण लेखसंग्रह असलेले ‘शिवनेरीचे वैभव’ हे दुसरे पुस्तक मुंबईतील ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या २८२ असून मूळ किंमत रूपये ३५०/- फक्त आहे. परंतु प्रकाशन पूर्व सवलतीच्या दरात स्वागत मूल्य रू. २८०/- फक्त प्रमाणे या पुस्तकाची अगाऊ ऑनलाइन नोंदणी गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वकाळात आपण सुरू करत आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर पुस्तक नोंदणी करावी, ही विनंती. यासाठी सोबत दिलेल्या गुगल पे मोबाइल क्र. +91 9167937040 नंबरवर किंवा स्कॅनर QR code चा उपयोग करून आपली प्रत आजच आरक्षित करावी. आपण पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट वरील नंबरवर पाठवावा, ही विनंती. 🙏
स्तंभलेखक संजय नलावडे
धोलवड जुन्नर (मुंबई)
मोबाइल - ९१६७९३७०४०



