सामाजिक

शिरदाळे येथे दीपोत्सव उत्साहात साजरा !!

1011658968
1011658968

पंचनामा प्रतिनिधी शिरदाळे – दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेचे औचित्य साधून शिरदाळे येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा दीपोत्सव साजरा केला.

मंदिर परिसरात असंख्य दिव्यांच्या माध्यमातून आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय होऊन वातावरणात चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण झाली होती. या दीपोत्सवामुळे दिवाळीच्या आनंदाला धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली किल्ले बनवा स्पर्धा. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

तसेच वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ डिजिटल अक्षरांमध्ये साकारण्यात आलेल्या ‘जय श्रीराम’ या फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी ह.भ.प. किसन महाराज तांबे, तान्हाजी महाराज तांबे, देवराम रणपिसे, सुभाष काचोळे, प्रभाकर तांबे, शंकर तांबे, संदीप मिंडे, संतोष रणपिसे, संतोष तांबे, सुभाष तांबे, गणेश तांबे, दत्ताभाऊ रणपिसे, संजय तांबे, संदेश वाघ यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दीपोत्सवाच्या माध्यमातून दिवाळीचा प्रकाश, धार्मिक परंपरेचे जतन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा सुंदर उपक्रम शिरदाळे ग्रामस्थांनी जपला.

1011605851

Related posts

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment