सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

1010355378
1010355408

पंचनामा प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर , प्रगती विद्यालय वडगावपीर तसेच माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी माजी सैनिक व शालेय विद्यार्थी यांनी प्रभात फेरी काढली. कारगिल दिनाच्या घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवंत टाव्हरे सर यांनी केले.प्रथमत कारगिल युद्धात शहिद झालेल्या सर्व वीर जवानांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

1010355386

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑन.कॅप्टन साहेबराव तलवंडीकर साहेब सैनिक योद्धा सेवाभावी संघ महाराष्ट्र राज्य हे होते.यावेळी माजी सैनिक योद्धा संघाचे सचिव श्री.बाळासाहेब नवले साहेब, कार्याध्यक्ष कारगिल योद्धा श्री.रामदास पालेकर साहेब, श्री.बापूसाहेब निलक साहेब,श्री. डी.पी.कान्हुरकर साहेब,श्री.तुळशीराम आदक साहेब,अण्णासाहेब पोखरकर,गोरक्ष आदक पाटील, रमेश रोकडे,बळवंत राजगुडे, छाया गुळवे, सुवर्णा राजगुडे, पालक, ग्रामस्थ तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक,वीर नारी, वीर माता पिता उपस्थित होते.

कारगिल युद्धप्रसंगी अनेक सैनिकांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.त्याबद्दलची माहिती आपल्या मनोगतातून बाळासाहेब नवले, दिपक पायगुडे, तुकाराम डफळ या माजी सैनिकांनी व्यक्त केली.कारगिल युद्धातील घडलेला सर्व इतिवृत्तांत माजी सैनिक व पंचायत समिती आंबेगाव मा. गटशिक्षणाधिकारी कारगिल योद्धा श्री. रामदास पालेकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

1010355365

याप्रसंगी सीमेवरील जवानांसाठी राखीसंकलन,वृक्षारोपण,विद्यार्थ्यांसाठी सैन्यात दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन सौ भालेराव मॅडम,संतोष रोकडे,वाळुंज मॅडम,पोखरकर मॅडम, साळवे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्री.गणेश गावडे सर यांनी केले.तर आभार माजी सैनिक श्री.नवनाथ डोके यांनी मानले.

1010355326

Related posts

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

Chief Editor

पंचनामा विशेष – ३ मे आंतरराष्ट्रीय बिबट दिन !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment