सामाजिक

राजुरीमध्ये “समर्थ” च्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन!! गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे प्रभावी माध्यम- बाळासाहेब औटी

img 20260108 133656
img 20260108 133714


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ लॉ कॉलेज,समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने ” शाश्वत विकासासाठी युवक,पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन ” या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे ६ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राजुरी येथे संपन्न होत आहे.
या शिबिराचे उदघाटन राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेठ शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,राजुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच माऊली शेठ शेळके,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत संघटक तसेच भैरवनाथ देवस्थानचे आवटेवाडी चे अध्यक्ष बाळासाहेब औटी,शरदचंद्र पतसंस्थेचे खजिनदार तसेच भैरवनाथ देवस्थान आवटेवाडी चे खजिनदार अशोकशेठ औटी,गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष पाटील औटी,राजुरी ग्रामपंचायतचे सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम आप्पा गाडेकर,गणेश दुध संस्थेचे संचालक व पत्रकार गंगाराम औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष गणेशराव हाडवळे तसेच समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,समर्थ बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,प्रा.शिवाजी कुमकर,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,डॉ.शरद पारखे,प्रा.दिनेश जाधव,प्रा.अश्विनी खटींग,प्रा.कल्याणी शेलार,प्रा.अजय भागवत,वल्लभ शेळके सर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी म्हणाले की,ई-पिक नोंदणी यापूर्वीही सर्वोत्तम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर राजुरी गावामध्ये समर्थ संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाचा शाश्वत विकास शक्य आहे. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून तसेच जलसंधारणाच्या माध्यमातून स्नेहलताई शेळके यांनी गावामध्ये विविध प्रकल्प यशस्वीरित्या राबवलेले आहेत.पडीक जमिनीला पाणी कसे मिळेल यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं.यावेळी वल्लभ शेळके यांनी या शिबिरात “शाश्वत विकासासाठी युवक,पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन” या उपक्रमाअंतर्गत डिजिटल लिटरसी,रस्ता सुरक्षा व पर्यटन विकास,नव मतदार जनजागृती नोंदणी व सर्वे, महिला सक्षमीकरण मेळावा,आरोग्य जागर, पर्यावरण संवर्धन,ग्राम सर्वेक्षण,ई -पीक पाहणी,आधार कार्ड व मतदार नोंदणी व जनजागृत,ई रेशन कार्ड,अन्नसुरक्षा व्याख्याने, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,स्त्री भ्रूण हत्या,जलसंवर्धन,पर्यावरण संरक्षण,महिला सक्षमीकरण,वनराई बंधारा,अंधश्रद्धानिर्मूलन पर जनजागृती कार्यक्रम,योगासने,स्त्री-पुरुष समानता,व्यसनमुक्त भारत,माझी वसुंधरा अभियान,पोस्टर सादरीकरण,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,स्थानिक इतिहास लेखन,एक मूठ धान्याची उपक्रम,शालेय स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले.


या शिबिरामध्ये एकूण २७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथील इंदिरानगर येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसवला सोलर वॉटर हिटर!!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) गावाने टाकली कात !! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानानिमित्त गावचे रूपडे पालटले!!

Chief Editor

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धेचा भक्तिरसात रंगलेला सोहळा संपन्न!!

Chief Editor

Leave a Comment