सामाजिक

मालमत्ता विरोधी पथकाची पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ;कांदळी येथील कला केंद्रावर गोळीबार करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या !!

1010554855

पंचनामा प्रतिनिधी समीर गोरडे – दि. 8.8.2026 रोजी पुणे ग्रामीण हद्दीतील नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरातील कांदळी गाव येथील कला केंद्र येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका गटाने फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करून आरोपी हे प्रसार झाले होते.यावरून चार आरोपींविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्यातील आरोपी हे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील रहिवासी असले बाबत गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना प्राप्त झाली.मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी मा. वरिष्ठांना त्याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमी वरून मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे पोलीस अमलदार हर्षद कदम. गणेश हिंगे. गणेश सावंत. विनोद वीर अशा पथकाने दि. 11•8•2026 रोजी रोहकल फाटा चाकण पुणे येथून आरोपी अविनाश लक्ष्मण कोळेकर (वय 30 वर्ष) राहणार हनुमान वाडी चाकण रोड आळंदी देवाची यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50000 किमतीचे 1 लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद करून पुढील कारवाईसाठी चाकण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपी विरुद्ध यापूर्वीही आळंदी पोलीस स्टेशन येथे शरीराविरुद्ध एक व जुन्नर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंद आहे.

Related posts

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

महाराष्ट्राची क्षयमुक्त दिशेने वाटचाल; पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले आरोग्य शिबिर !!

Chief Editor

शिरदाळे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंचांग वाचण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम !!

Chief Editor

Leave a Comment