
पंचनामा प्रतिनिधी – श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम मंदिर चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध नामवंत भजनी मंडळे व कलाकार सहभागी झाले होते ज्यातून भाविकांसाठी भक्तिरसाची मेजवानी अनुभवायला मिळाली.

आंबेगाव तालुका नाभिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवांतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमापूजनाने झाली, त्यानंतर सकाळी ९ वाजता श्रींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह. भ. प. स्वप्निल महाराज दातखिळे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. दुपारी १२ वाजता श्री संत ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ, पारगाव (शिंगवे) यांचा भजन दुसरा व्या अशा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.दुपारनंतर श्री भैरवनाथ प्रसादिक संगीत भजन मंडळ ढाकाळे यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

हा कार्यक्रम श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, आंबेगाव तालुका नाभिक समाज व समस्त ग्रामस्थ पारगाव (शिंगवे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.



