
पंचनामा प्रतिनिधी लोणी – वाळुंजनगर, लोणी (ता.आंबेगाव) येथील ह. भ. प. श्री. संजय विष्णू वाळुंज महाराज यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या आंबेगाव तालुका सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ह. भ. प. संजय महाराज वाळुंज हे धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत असून, गावातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांमध्ये परिचित आहेत. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गावातील विविध उपक्रमांमध्ये ते सदैव अग्रेसर असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेत निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेने त्यांची आंबेगाव तालुका सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील परमार्थिक व सामाजिक वाटचालीस भक्तिमय शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



