
जांभोरी : गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक तरुण मंडळ, नांदुरकिचीवाडी-जांभोरी यांच्या वतीने गावातील सर्व महिलांना एकत्र आणून ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा, सन्मान महिलांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, महिलांनी एकत्र येत विविध मनोरंजक खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमात सौ. कविता विकास केंगले यांनी प्रथम क्रमांक मिळवत पैठणीची मालकीण होण्याचा मान मिळविला. विजेत्या महिलांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम पारितोषिक – पैठणी, सौजन्य सौ. अश्विनीताई चंद्रकांत लोहकरे; द्वितीय – गॅस शेगडी, सौजन्य सौ. वैशालीताई राजेंद्र केंगले; तृतीय – मिक्सर, सौजन्य सौ. शितलताई योगेश केंगले; चतुर्थ – टेबल फॅन, सौजन्य सौ. दिपालीताई बबन केंगले; पाचवे – इस्त्री, सौजन्य सौ. आशाताई बळीराम केंगले; सहावे – डिनर सेट, सौजन्य सौ. संजनाताई कुमार इष्टे; सातवे – इडली आप्पे भांडे, सौजन्य सौ. निलमताई किसन केंगले; आठवे – आकर्षक भेटवस्तू, सौजन्य सौ. रेश्माताई वसंत केंगले अशी बक्षिसे देण्यात आली.
तसेच सर्व सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून ५० आकर्षक गिफ्ट वस्तू देण्यात आल्या. त्याचे सौजन्य सौ. शैलाताई शरद बांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्री. अंकुश गिरंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली राजेंद्र केंगले यांनी केले.
कार्यक्रमासाठी जांभोरी गावचे उपसरपंच बबनराव केंगले, माजी उपसरपंच प्रमोद केंगले, विलास केंगले, तसेच राज केंगले, मोहन लोहकरे, भिमा केंगले, दत्तु मेचकर, ज्ञानेश्वर केंगले, नितीन गिरंगे, बळीराम केंगले, बाळु गिरंगे, शांताराम लोहकरे, सोमा भवारी, किरण गिरंगे, रमेश जढर, योगेश केंगले व गणेश केंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
अष्टविनायक तरुण मंडळाचे अध्यक्ष यश भवारी व सचिव आदित्य गिरंगे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमातील जेवणाच्या व्यवस्थेसाठी AK रिसोर्टचे प्रो.प्रा. आदित्य जगदीश केंगले व प्रो.प्रा. उदित जगदीश केंगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व महिलांनी एकत्र येत आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आनंदात व यशस्वीरीत्या पार पडला.


