सामाजिक

डॉ. हेमंतकुमार डुंबरे डॉक्टरेट पदवीने सन्मानीत ;राष्ट्रपती भेटीचे निमंत्रण” !!

img 20260627 wa0597
1009967158

पंचनामा विशेष – शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे सुपुत्र डॉ. हेमंतकुमार डुंबरे यांना काल शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

America International University 6464, W Sunset Blvd, California USA युनिव्हर्सिटीने डॉ. हेमंतकुमार डुंबरे यांना मानद पदवी प्रदान केली आहे. डॉ. डुंबरे यांनी मधमाशी संवर्धन व प्रशिक्षण यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना ही पदवी देण्यात आली आहे. डॉ. हेमंतकुमार डुंबरे यांनी पदवीदान समारंभानंतर, ‘ही पदवी मी समस्त मधमाशांना समर्पित करत आहे’ असे भावपूर्ण उद्गार काढले.

मधमाशीने मला काय दिले? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की, मधमाशीने मला मान – सन्मान, लौकिक, प्रसिद्धी, पैसा, फिरणे, समाधान असे बरेच काही दिले. मधमाशी पालन का करावे, मधमाशांचे महत्त्व आणि शुद्ध मध कसे ओळखावे या विषयावर जनजागृती आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. हेमंतकुमार डुंबरे गेली अनेक वर्षे करत आहेत. कीटक हे विविध परिसंस्थेतील अविभाज्य घटक असून निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांचे जसे फायदे आहेत तसे तोटेही! डॉ. हेमंतकुमार डुंबरे हे कीटक अभ्यासक आणि मास्टर ट्रेनर असून निसर्गात मधमाशी किती महत्त्वाची आहे आणि जैवविविधतेचा एक एक पैलू आपल्या व्याख्यान आणि कार्यशाळेच्या माध्यमातून प्रकाशात आणतात. डॉ. हेमंतकुमार डुंबरे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून आज त्यांना भारताच्या महामहिम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांनी सदिच्छा भेटीसाठी आमंत्रित केले आहे. डॉ. हेमंतकुमार डुंबरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹

     स्तंभलेखक संजय नलावडे
          धोलवड / मुंबई
1009962020
1009944556

Related posts

ईपीएफओ उच्च पेन्शनसाठी वंचित पेन्शनधारकांचे शरद पवारांना साकडे !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment