सामाजिक

वाफगाव येथील यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप !!

1009969175
1009969175

पंचनामा प्रतिनिधी – वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय साहित्य व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

आपण शाळेचे देने लागतो या हेतूने तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये या उद्देशाने वाफगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य व वह्या वाटप हा उपक्रम राबविला. हा स्तुत्य उपक्रम विद्यालयातील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी राबविण्यात येत असल्याचे माजी विद्यार्थी व उपक्रमाचे संयोजक प्राध्यापक पांडुरंग थिटे यांनी सांगितले.

गावातील माजी विद्यार्थी शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन शिक्षण घ्यावे असे आवाहन मुख्याध्यापक एन. एन. डोके यांनी केले.

याप्रसंगी वरुडे गावचे मा. सरपंच व माजी विद्यार्थी मारुती थिटे,मा. उपसरपंच नंदकुमार सुर्वे ,खेड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ईसाक मुलाणी ,पांडुरंग थिटे ,संतोष घोंगणे, राजेंद्र कंगणे,रमेश रणपिसे,संजय खुरपे या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक एन.एन.डोके ,पी.बी.गोडे, इम्रान मुलाणी , दत्तात्रय पाचपुते ,सारिका मोहरे ,अमृता सोनार ,विजय सांडभोर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

वाफगाव येथील होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप करताना मान्यवर

1009964533
1009948090

Related posts

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आविष्कार’ पोस्टर्स स्पर्धा उत्साहात !!

Chief Editor

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

शिंगवे येथे दर पौर्णिमेला भैरवनाथ पालखी सोहळा ; वारकरी विद्यार्थ्यांचा सहभाग; ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत !!

Chief Editor

Leave a Comment