
साभार लेख – शाहीर खंदारे
तमाशाचा सुवर्ण काळ नाते कलेचे माझ्या रक्ताशी या लेखमालेतून सुटणारे आकर्षण
वन्स मोर किंग, शेर शायरी,गायक, आलाउंसर,मराठमोळी सोंगाड्या, आणि वगनाट्यातील भूमिका करणारे एक अष्टपैलू कलावंत, म्हणजेच कै आमन अहमद तांबे कोंढवा,जि.पुणे होय.
त्यांच्या पत्नीचे नाव जरीना आमन तांबे असून राहील आणि साहिल अशी दोन मुलं आहेत.एक मुलगी आहे. मुळातच अंगात थोडी कला अवगत होती, म्हणून त्यांनी सोळाव्या वर्षामध्ये तमाशा क्षेत्रातप्रवेशा केला.खरंच परमेश्वराने त्यांना कंठातून सुटणाऱ्या आवाजाची देणगीच बहाल केली होती हे अगदी खरं……
त्यांच्या गायनाचे स्वर,शब्दांची फेक आणि गाताना अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा होता.कार्यक्रम संपल्यानंतर रसिक रावटी मध्ये जाऊन त्यांना पाठीवर शाबासकीची थाप देत होते हीच त्यांच्या कलेची एक अजरामर पावती ठरली.
अशी अष्टपैलू कला परमेश्वराने मोजक्याच लोकांना दिलेली आहे. कारण अशी कला आत्मसात करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते.त्यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपातून अनेक गावांशी आणि प्रेक्षकांशी ,आपली नाळ जोडली होती. स्टेजवर ते कधी येतील याची रसिक वाट बघत होते, आणि ते येताच रसिक उभे राहून शिट्ट्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करीत होते. हे अगदी सत्य आहे.
प्रेक्षकामध्ये जाऊन गाणे गाणारे ते पहिलेच कलावंत होते,अमान तांबे हे पुण्यातील आर्यभूषण थेटर चे संचालक होते.त्यांनी अमान तांबे सह सरस्वतीबाई कोल्हापूरकर या नावाने फड देखील उभा केला होता.दुसरे असे की त्यांनी अनेक चित्रपटात आणि टीव्ही मालिकेमध्ये सोंगाड्या म्हणून काम केले. तमाशा मधील रंगबाजी दाखवण्याची त्यांची हातोटीच काही वेगळी होती.
सामाजिक,कौटुंबिक,ऐतिहासिक अनेक वगनाट्य मध्ये भूमिका करून त्यांनी महाराष्ट्रात आपले नाव आजरामर केले.त्यांची ओळख म्हणजे, निसर्ग राजा ऐक सांगतो आणि साईबाबा बोलो,जीवा शिवाची बैल जोड….रसिकांची मने जिंकणारी ठरली.महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, म्हणून त्यांना ओळखल्या जात होते.

काही दिवसापूर्वी हा तमाशा फड नावा रूपाला आलेला होता…..राहिलेली एक आठवण, खोपोली जवळील साजगाव येथे यात्रा निमित्ताने पंधरा दिवस हाउसफुल तमाशा फड चालत होता….. खरंच…. आठवा तो पूर्वीच्या तमाशाचा काळ ….साऊंड सिस्टिम मध्ये इको एक सारखे ड्रेसिंग ,ग्रुप डान्स आणि कोरस डान्स हा त्यांनी सुरू केला. वगनाट्यात दुखी भूमिकेची एक्टिंग करून प्रेक्षकांच्या डोळ्यात गंगा यमुना उभ्या राहत होत्या.
कैलासवासी अमन तांबे यांनी 50 वर्ष रसिकांची आणि रंगदेवतेची सेवा करून कलेसाठी आपले भरपूर भरपूर योगदान दिले. शिवाय 2022 मध्ये त्यांनी पठ्ठे बापूराव हा पुरस्कार पटकावला.
श्री मेघराज राजे भोसले यांनी सुद्धा ज्येष्ठ कलावंत म्हणून नावाजले होते. सिनेस्टार या नावानेही त्यांना ओळखत होते .त्यांचे वय 66 वर्षे होते…..
असे अष्टपैलू कलावंत होणे नाही.
हे कलावंत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन तमाशा कला जिवंत ठेवून स्वर्गलोकी निघून गेले. हे किती मोठ आपलंभाग्य आहे…….
अशा थोर कलावंतांची मागील काळातील आठवण झाली म्हणजे रुदय दाटून येते…..अशेच कलावंत या भारत मातेच्या भूमीत जन्माला यावेत हीच जगदंबा मातेचे चरणी प्रार्थना ……….
लेखक- शाहीर खंदारे
ता.नेवासा
8605558432


