सामाजिक

अखेर ‘करण’ च्या मदतीला खाकी वर्दी आली धावून

1010255264

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे


लोणी (ता.आंबेगाव )येथील करण फुलमाळी (वय 16)या मुलाचे कपडे त्याच्या वडिलांनी शिवीगाळ करून जाळून टाकले. मुलाने तात्काळ पोलीस स्टेशन ला फोन केला नंतर दहा मिनिटातच पारगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व टीम मदतीला धावून आले
सोमवार (दि. 20) रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला फुलमाळी यांचा फोन आला व त्याने वडिलांकडून सातत्याने होणारा त्रास व कपडे जाळून टाकले व घरातून निघून गेल्याची सविस्तर घटना पोलिसांना सांगितली.पोलिसांनी करण वर झालेला अन्याय सर्व हकीकत ऐकून घेतली व त्यास दुकानात जाऊन कपडे घेऊन दिले व घरी सोडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्वतः पुढाकार घेऊन करण यांस आधार दिला असून यापुढे कधीही मदत लागल्यास फोन कर असे सांगितले आहे

पारगाव (ता. आंबेगाव )येथे करण फुल माळी यांस कपडे देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे

1010255264

Related posts

कळमोडी धरण १००% भरले; आरळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

Chief Editor

निधन वार्ता – कै.सौ.कलाबाई नामदेव सुक्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..

Chief Editor

सिझन पूर्वी तमाशाची रूपरेषा आखून सर्वत्र त्याची अंमलबजावणी करावी – मा.मुसाभाई इनामदार

Chief Editor

Leave a Comment