सामाजिक

तरुणांनी मोठ्या संख्येने पायी वारीत सहभागी व्हावे – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील

1009962045
1009962045

पंचनामा प्रतिनिधी – आळंदी येथे ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांची पारगाव (ता.आंबेगाव) येथील वारकरी व ग्रामस्थांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा झाली.

पारगाव येथील काही तरुण दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अंतर्गत आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत उत्साहाने सहभागी होत असतात. याच पार्श्वभूमीवर पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे हे एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी आळंदी येथे गेले असता त्यांची ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याशी भेट झाली.

यावेळी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी, “दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने पायी वारीत सहभागी व्हावे. विशेषतः तरुणांनी वारीची परंपरा, संस्कार आणि भक्तीचा आनंद अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असा संदेश दिला. तसेच यंदाच्या वारीसाठी त्यांनी आवर्जून स्नेहनिमंत्रणही दिले.

या प्रसंगी पारगावचे मा.आदर्श उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ह.भ.प. निवृत्ती महाराज लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे, घनश्याम लोखंडे तसेच युवा उद्योजक अतुल पवळे उपस्थित होते.

आळंदी ते पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा करताना पारगावचे मा.आदर्श उपसरपंच विठ्ठल ढोबळे समवेत ग्रामस्थ.

1009962020
1009944556

Related posts

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

लोणी (धामणी ) गावाने जपली कलगीतुऱ्याची परंपरा; नागपंचमीच्या निमित्ताने रंगणार कलगीतुऱ्याचा सामना !!

Chief Editor

उष्णतेचा कहर कायम; पण आजपासून पावसाची शक्यता !!

Chief Editor

Leave a Comment