सामाजिक

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री.के.डी.भोजने यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अतुल डामसे !!

1009964101
1009964179

पंचनामा प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री.के.डी.भोजने यांची बिनविरोध तर सचिवपदी अतुल डामसे यांची निवड झाली आहे

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा कार्यकाल संपल्याने नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. दि.26 जून 2026 रोजी पंचायत समितीच्या आमसभेच्या माध्यमातून सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत ज्येष्ठ ग्रामपंचायत अधिकारी श्री.के.डी.भोजने यांच्या बिनविरोध निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास सर्वांनी एकमताने पाठिंबा जाहीर केला.

इतर पदांच्या निवडी सुद्धा बिनविरोध करण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग कडाळे वैशाली गवारी, कोषाध्यक्ष संजय जोशी, कार्याध्यक्ष मनीषा वळसे प्रसिद्धी प्रमुख सचिन बनकर तर संचालक म्हणून रूपाली देवडे,दिलीप भालिंगे,राहुल पाटील मारुती देवाडे,उदाराम लिखार यांच्या सर्वांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संघटनेचे मा.अध्यक्ष अनिल टेमकर,बाबाजी चव्हाण,जयवंत मेंगडे,शितल निघूट,ज्योती वेताळ व सचिव मंगेश जोशी यांनी प्रयत्न केले.

1009964101

संघटनेचे अध्यक्ष के.डी.भोजने यांचा नोकरीचा असणारा प्रदीर्घ अनुभव ,तसेच राजकीय,सामाजिक असणारे संबंधामुळे संघटनेच्या कामकाजास निश्चित फायदा होईल. यापुढील काळात ग्रामसेवक बांधवांचे अडीअडचणी तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.भोजने यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.निवडणूक निरीक्षक म्हणून सुरेखा कुदळ यांनी काम पाहिले

1009948090
1009944556

Related posts

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त धामणी (लोणी ) येथे विविध कार्यक्रम झाले संपन्न !!

Chief Editor

धक्कादायक – धामणी (ता.आंबेगाव) येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला !!

Chief Editor

श्री भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment