सामाजिक

पंचनामा विशेष – असे तमाशाफड ;असे तमाशाफड व्यवस्थापक -मा. पोपट बेंगारेमामा

img 20260402 wa0463

पंचनामा प्रतिनिधी – तमाशा पंढरी काळज येथील एक अनुभव संपन्न,तज्ञ मॅनेजर मा. पोपट बेंगारेमामा, राहणार गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा हे सध्या सुनीता राणी बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर आहेत.

तमाशाफड हे मॅनेजर यांच्या कौशल्यावर ,अनुभवावर आणि बोलपटावर अवलंबून आहेत. तमाशा फडाचा नावलौकिक
हा मॅनेजरंच्या शब्द शब्दातून यात्रा कमिटीला भावत असतो .

श्री पोपट बेंगारेमामा यांनी १९८५ पासून तमाशा फडाचे मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली आहे. तळमळीने आणि कष्टाने
अनेक तमाशा फडांचे मॅनेजर म्हणून उत्कृष्ट काम करून,
त्यांनी नावलौकिक जपलेला आहे.

मा.बेंगारेमामा म्हणतात की, मॅनेजर हा तीक्ष्ण नजरेचा पाहिजे .येणा-या यात्रा कमिटीला अतिशय सुंदर मार्गदर्शन करून भक्कमपणे तमाशा फडाचा बाज समजून सांगितला पाहिजे. तरच यात्रा कमिट्या करार करतात.
मॅनेजरने अतिशय प्रामाणिकपणे सत्यावर आधारित बोलले पाहिजे.
यात्रा कमिटीला खरे दिसले पाहिजे.

फसवणूक प्रामाणिकपणाची
बरोबरी करू शकत नाही
सत्याला मारणारी शक्ती या
जगात अजून जन्मली नाही

महाराष्ट्र तमाशा कला पंढरी ही संस्था काढून त्यांनी तमाशा फडांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तमाशा फडाने गावच्या यात्रेत अतिशय सुंदर कार्यक्रम केला तर कुठल्याही प्रकारच्या तक्रारी वाव शिल्लक राहत नाही. तमाशा फडाच्या अटी या करारामध्ये नमूद करून यात्रा कमिटी बरोबर विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे असे श्री बेंगारे म्हणाले.

एक सुंदर स्वभावाचा सुंदर माणूस ,आपलेपणा जपणारा माणूस ,माणसावर मनापासून प्रेम करणारा माणूस , स्पष्टपणा आणि शिस्त जपणारे बेंगारेमामा आहेत.

      राजेंद्र. डी .मोरे, बारामती
fb img 1773887068819

Related posts

वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप संपन्न !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

कौतुकास्पद….राळेगण (ता.जुन्नर) येथे संपन्न झाला माहेरवाशीनींचा मेळावा !!

Chief Editor

Leave a Comment