सामाजिक

खडकवाडी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; आंबा, मका पिकांचे मोठे नुकसान!

1011797684

रात्रीच्या वेळी २० ते ३० रानडुकरांचे कळप शेतात दाखल; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी :

खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील नायठार वस्ती परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रानडुकरांच्या कळपाने शेतात घुसून आंबा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मथु सुक्रे यांच्या आंब्याच्या बागेचे, तसेच अनंथा भोजने-वरदरा यांच्या मका पिकाचे रानडुकरांनी मोठे नुकसान केले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

1011797684

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री अकरानंतर रानडुकरांचे कळप मोठ्या संख्येने शेतशिवारात दाखल होतात. एका कळपात साधारण २० ते ३० रानडुकरांचा समावेश असतो. रात्रीच्या वेळी रानडुकरांचा वावर वाढल्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. मात्र, तरीदेखील पिकांचे नुकसान टाळणे कठीण झाले आहे.

या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. रानडुकरांमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात पिकांचे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात माजी सरपंच अनिल डोके यांनी वनपाल नीलम चव्हाण यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज घेऊन वनविभागाच्या कार्यालयात यावे, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

1011797703

यावेळी उपसरपंच एकनाथ सुक्रे, आदिनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, शेखर सुक्रे, वैभव सुक्रे, माजी सरपंच कमल सुक्रे, श्रीराम वाळुंज यांच्यासह ग्रामस्थांनी रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

वनविभागाने केवळ अर्ज मागविण्यापुरती कार्यवाही न करता प्रत्यक्ष शेतशिवाराची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि रानडुकरांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खडकवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 411615

Related posts

समर्थ फार्मसी,बेल्हे मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

मोरडेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जाणार युरोप, नासा व इस्रोला !!

Chief Editor

Leave a Comment