सामाजिक

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

1009907813
1009907813

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामविकास प्रतिष्ठान, नांदुरकिचीवाडी (जांभोरी) यांच्या पुढाकाराने आणि एरियोटेक सोल्युशन प्रा. लि., पुणे यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुरकिचीवाडी, हरणमाळ, माचीचीवाडी, जांभोरी तसेच न्यू इंग्लिश स्कूल, जांभोरी येथील विद्यार्थ्यांना एरियोटेक सोल्युशन प्रा. लि. चे सीईओ श्री.वसंत खोकले आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. सत्यशीलदादा शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय बॅग, वह्या, चित्रकला वह्या, ऑईल पेस्टल कलर सेट, पेन, जॉमेट्री बॉक्स, कंपास बॉक्स, स्केच पेन बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सौ. सुचेता खोकले, श्री. रवी तळेले, श्री. यशराज काळे, श्री. संदीप शिंदे, श्रीमती खुशी चावला, श्रीमती हिमांशी अग्रवाल, श्रीमती प्रज्ञा वाघुले तसेच एरियोटेकच्या संपूर्ण टीमचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.अंकुश गिरंगे यांनी केली. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. किसन गिरंगे यांनी ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अंकुश केंगले यांनी मान्यवरांचे आभार मानले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम नांदूरकिचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

या उपक्रमासाठी श्री.किसन भाऊ केंगले यांचे विशेष योगदान लाभले. तसेच जांभोरी गावातील माजी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.

1009907806

याशिवाय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, उप-सरपंच बबन केंगले पोलीस पाटील नवनाथ केंगले तरुण वर्ग, माजी नोकरदार वर्ग, ज्येष्ठ मान्यवर, महिला भगिनी, सर्व शाळांचे गुरुवर्य, विद्यार्थी व त्यांचे पालक यांचेही अमूल्य सहकार्य लाभले.प्रत्येकाने उचललेला खारीचा वाटा या उपक्रमाच्या यशामागील महत्त्वाचा आधार ठरला.

कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवर, विद्यार्थी व पालकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद बांबळे यांनी केली होती. त्यांच्या या सहकार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन दिलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असून, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श नमुना ठरत आहे. शिक्षण, समाजसेवा आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

1009828026
1009850407

Related posts

निरगुडसर परिसरात रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांना सहन करावा लागतोय मनःस्ताप !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली स्वच्छता मोहीम!!

Chief Editor

Leave a Comment