सामाजिक

श्री भैरवनाथ विद्याधामच्या तीन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक ;आयुष भागवत राज्यात सहावा; सुजल आदक १५वा तर भक्ती लंके १८व्या क्रमांकावर !!

1010480979

लोणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या NSSE परीक्षा २०२६ च्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधामच्या तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेसह लोणी गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

1010480960

इयत्ता पाचवीतील आयुष राहुल भागवत याने २०० पैकी १८४ गुण मिळवत राज्यात सहावा क्रमांक मिळविला. इयत्ता सहावीतील सुजल संदीप आदक याने २०० पैकी १६६ गुणांसह राज्यात १५ वा क्रमांक, तर भक्ती वैभव लंके हिने २०० पैकी १६० गुण मिळवत राज्यात १८ वा क्रमांक पटकावला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मा. श्री. थोरात सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

NSSE परीक्षेतील या यशामुळे श्री भैरवनाथ विद्याधामच्या शैक्षणिक कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे हे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

1010480394
1010456658

Related posts

भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड २०२५-२६ गोव्यात संपन्न होणार !!

Chief Editor

इंदू –

Chief Editor

अण्णासाहेब आवटे कॉलेजला तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग !!

Chief Editor

Leave a Comment