सामाजिक

निरगुडसर येथील बेटवस्ती-कारवस्ती येथे श्री मुक्तादेवी भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न !!

1010468400

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील बेटवस्ती-कारवस्ती, निरगुडसर येथे श्री मुक्तादेवी भंडारा उत्सव मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

उत्सवानिमित्त सकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत मांडव डहाळे चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत देवीचा अभिषेक करण्यात आला. दुपारी ३ ते ५ या वेळेत बीरोबा प्रसादिक भजन मंडळ, निरगुडसर यांच्या सुश्राव्य भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर पारंपारिक वाद्याच्या सुरात शेरनीच्या मिरवणुकीचा व वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात महिला भगिनींचा समावेश लक्षवेधी होता.सायंकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाची व्यवस्था विठ्ठल मंदिर, बेटवस्ती येथे करण्यात आली होती.

1010468385

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य,मा. सरपंच दादाभाऊ टाव्हरे, श्री. नवनाथ टाव्हरे, जालिंदर टाव्हरे, भास्कर टाव्हरे, अरुण टाव्हरे, रभाजी टाव्हरे, शांताराम टाव्हरे, मच्छिंद्र टाव्हरे, हर्षद टाव्हरे, तान्हाजी टाव्हरे व बाळू सुक्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच बेटवस्ती-कारवस्ती व परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्री मुक्तादेवीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात दिवसभर धार्मिक व भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

1010391286
1010457105

Related posts

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या ; मुद्रांक व नोंदणी विभागातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ !!

Chief Editor

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन !!

Chief Editor

धामणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भक्तीबरोबरच सामाजिक सेवेचा जागर

Chief Editor

Leave a Comment