
प्रतिनिधी -समीर गोरडे
पंचनामा प्रतिनिधी – आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती पारगाव (शिंगवे) येथे मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली..यावेळी महिला बचत गटाच्या सर्व महिला,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बचत गटाच्या सर्वं महिलांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले . या स्पर्धांमध्ये बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच खाऊ वाटप ही करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी शरद सहकारी बँकेचे दौलतराव लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना राजांचा इतिहास सांगितला , तसेच ज्येष्ठ नागरिक संघ किसन ढोबळे, बबन लोखंडे, काळूराम लोखंडे, सचिन दातखिळे, शंकर देवडे, ज्ञानेश्वर आढवळे, शंकर दातखिळे, विवेक चव्हाण, रामदास रोडे ,वर्षा रोडे,सायली रोडे,सोनाली रोडे, लीलाबाई मुसूडगे,राधाबाई रोडे, शारदा मुसूडगे,साधना रोडे,जनाबाई चव्हाण, छाया रोडे,इंद्रायणी चव्हाण,रेश्मा चव्हाण ,ललिता चव्हाण, भाग्यश्री चव्हाण,गोपाबाई गफले,प्रमिला चव्हाण,ज्योत्सना अस्वारे आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य संतोष लबडे ,शिक्षक वृंद यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच विजय वळसे सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल गटाच्या महिलांनी त्यांचा सन्मान केला.


