सामाजिक

जारकरवाडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पारगाव कारखाना पोलीसांकडून जनजागृती !!

1010416786

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनकडून पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात पारगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी शीतल पोखरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले व्यसन आणि किशोरवयीन मुलींची सुरक्षितता या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केले. तसेच इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक, शैक्षणिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. सोशल मीडियाचा गैरवापर टाळून शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत मोबाईलचा अतिरेक टाळणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

शीतल पोखरकर मॅडम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली असून, उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

1010391286

Related posts

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा बेल्ह्यात ‘आविष्कार’; पुणे-मुंबई विभागीय फेरीसाठी समर्थ इन्स्टिट्यूट सज्ज !!

Chief Editor

मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या जप्त वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिलाव !!

Chief Editor

वारीत सौरऊर्जेची साथ,वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची अभिनव सुविधा;महाऊर्जाचा स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेला चालना देणारा लोकाभिमुख उपक्रम !!

Chief Editor

Leave a Comment