सामाजिक

पारगाव (शिंगवे) मध्ये सायबर सुरक्षेसह व्यसनमुक्ती जनजागृती अभियान; विद्यार्थ्यांना सुरक्षेची शपथ !!

1010416248

पंचनामा प्रतिनिधी – आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि अंमली पदार्थांचा वाढता वापर हे समाजासमोरील अत्यंत गंभीर आव्हान बनले आहे. डिजिटल अरेस्ट, जादा परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या फसव्या योजना, APK फाईल्स तसेच अनोळखी लिंक्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मा. श्री. सचिन कांडगे यांनी केले.

1010416258

भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय व दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर सुरक्षा व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात सचिन कांडगे यांनी सायबर गुन्हेगारीचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीपासून घ्यावयाची काळजी, अंमली पदार्थांचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी यावर सविस्तर प्रकाश टाकला.

1010416136

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात भीमाशंकर शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. श्री. बबन चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. तसेच व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक व करिअरच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला.

या कार्यक्रमादरम्यान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील ‘स्पर्धा परीक्षा विभागाचे’ उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी ‘सायबर सुरक्षा शपथ’ घेतली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामनाथ फदाले यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राहुल डोळस यांनी केले, तर प्रा. विलास दातीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1010391286

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

समर्थ क्रीडा संकुलात जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात ;४० शाळांतील मुला-मुलींच्या संघांचा सहभाग !!

Chief Editor

पासबुक आणि श्वास बूक” हे दोन्ही रिकामे ठेऊन चालत नाही

Chief Editor

Leave a Comment