सामाजिक

वडगावपीर येथे श्री बोल्हाई माता ९ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार

fb img 1787625523412

वडगावपीर ( ता.आंबेगाव )येथील श्री बोल्हाई माता सेवा मंडळाच्या वतीने श्री बोल्हाई माता मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार असून यानिमित्त बुधवार (दि.१४ ) रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजता ह.भ.प. मनिषाताई आदक यांची किर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
गुरुवार ( दि.१५ ) रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, सकाळी ५ ते ७ वाजता काकडा, सकाळी ९ ते ११ या वेळेत आईच्या मानाच्या साडयांची मिरवणूक, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अभिषेक, महापूजा व होमहवन, दुपारी १२.३० ते २ या वेळेत खिचडी व फळांचे वाटप, दुपारी २ ते ४ या वेळेत भजन, तर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता ह.भ.प. अश्विनीताई टाव्हरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.१५ ते १०.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री बोल्हाई माता सेवा मंडळ, बोल्हाई वाडी, वडगावपीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


1011298056
1011291568

Related posts

समर्थ लॉ कॉलेजमध्ये ‘व्यावसायिक नीतिशास्त्र आणि न्यायालय अवमान कायदा’ विषयावर व्याख्यान ; निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.सोपान निकम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला मातृ पितृ पूजन दिवस!!

Chief Editor

धामणीत चैञी पौर्णिंमेला खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी !!

Chief Editor

Leave a Comment