सामाजिक

विजय वळसे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार !!

1010877817

पंचनामा प्रतिनिधी – शिंगवे ( ता.आंबेगाव ) येथील गाढवे- गोरडे मळा येथे कार्यरत असणारे विजय वळसे यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदेश शिक्षक पूरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील. मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील व उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते त्यांनी सपत्नीक स्विकारला
त्यांना हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वळसे यांनी अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याबरोबरच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव असून, त्यांच्या यशामुळे परिसरातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

माळशेज घाटामध्ये करांजले गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचला ;आळेफाटा कडून कल्याण कडे जाणारी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद !!

Chief Editor

माळीन फाटा-असाणे रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची व प्रवाशांची मागणी !!

Chief Editor

वारीत सौरऊर्जेची साथ,वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची अभिनव सुविधा;महाऊर्जाचा स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेला चालना देणारा लोकाभिमुख उपक्रम !!

Chief Editor

Leave a Comment