सामाजिक

आळंदीत मुक्तादेवी धर्मशाळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली संपन्न !!

img 20260221 wa0482
img 20260221 wa0486

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा तसेच संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने तीर्थक्षेत्र आळंदी येथे मुक्तादेवी धर्मशाळेत महामंडलेश्वर स्वामी ज्ञान चैतन्य पुरी (आळंदी) यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी पारगावतील ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक वातावरण,हरिनामाच्या गजरात आणि पारंपरिक वाजत-गाजत हा सोहळा भक्तिभावाने पार पडला.या सोहळ्यापूर्वी पारगावमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. गावातील संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ,महिला-पुरुष भाविक, तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. टाळ-मृदुंग, झांज,हलगी यांच्या निनादात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

शुक्रवार दिनांक २० रोजी सकाळी धार्मिक विधींना सुरुवात झाली. गणपती पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना, होम-हवन आदी विधी वेदघोषात पार पडले.सकाळी ११ वाजता विधिवत मंत्रोच्चारात मूर्तींची स्थापना करण्यात आली.यावेळी उपस्थित भाविकांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात वातावरण भारावून टाकले.

img 20260221 wa0482

दुपारी ह.भ.प. दीपक महाराज लेकावळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.कीर्तनातून त्यांनी भक्ती, सदाचार आणि संत परंपरेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.त्यांच्या प्रभावी वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.यावेळी अध्यक्ष भागचंद पोंदे,उपाध्यक्ष मधुकर दातखिळे,संचालक चंद्रकांत लोखंडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे,शरद सहकारी बँक चे संचालक दौलत लोखंडे,बबनराव ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे रामदास लबडे,विठ्ठल दातखिळे,निवृत्ती ढोबळे,बजरंग देवडे,दिलीप लोखंडे,माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे,राजू साबळे,गणपत ढोबळे,राजू ढोबळे तसेच पारगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे अन्नदान महेश पाटील यांच्या वतीने होते.या सोहळ्यास पारगाव तसेच परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि भजन मंडळाच्या पुढाकारामुळे हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रवचन,होमहवन, कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

fb img 1771121541695

Related posts

जिद्द,कष्ट आणि यशाचा सुवर्णमहोत्सव; निरगुडसरच्या डॉ.शितल शिंदेची राज्यात दुसरी क्रमांकाची झेप !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात;परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही- ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे

Chief Editor

Leave a Comment