सामाजिक

सॅंडोज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची निवड !!

img 20260221 wa0464


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल च्या वतीने नुकतेच पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये फार्मसी च्या अंतिम वर्षातील २६ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग दर्शविला.
मुलाखतीमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी तसेच परिसरातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांची प्रथम फेरीमध्ये लेखी परीक्षेद्वारे निवड करण्यात आली.त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या.
यामध्ये महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
सॅंडोज कंपनीचे एच आर समीर चव्हाण व प्रॉडक्शन हेड प्रदिप गाडे यांनी मुलाखतीची सर्व निवड प्रक्रिया पूर्ण केली.
ऑपरेटर व सुपरवायझर या पदांसाठी सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
समर्थ फार्मसी मधील यश हादगे-सुपरवायझर, महेश पुजारी व सिद्धेश नऱ्हे-ऑपरेटिव्ह सुपरवायझर ,राहुल राऊत-ऑपरेटर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.बिपीन गांधी,डॉ.सागर तांबे,प्रा.सचिन पोखरकर यांनी कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी नियोजन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,विभागप्रमुख डॉ.नितीन महाले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1771121541695

Related posts

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी होणार १४ व १५ जुलै रोजी !!

Chief Editor

शिक्षण व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांना निवेदन !!

Chief Editor

वाळव्याचा बहुमान सर्वदूर नेणारा कलायात्री : विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर

Chief Editor

Leave a Comment