सामाजिक

पंचवीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्याची भेट आणि सोनेरी पेन !!

img 20260221 wa0013

पंचनामा विशेष – पंचवीस वर्षांपूर्वी मंदोशी शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळविलेला माजी विद्यार्थी सध्याचा एक यशस्वी उद्योजक जितेंद्र हुरसाळे याने आपल्या शिक्षकांना व मोहकल शाळेला अचानक भेट देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला.या भेटीदरम्यान त्याने मोहकल शाळेतील सर्व
विद्यार्थ्यांना शैक्षणिक नित्योपयोगी साहित्याचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांना भेटण्यासाठी त्याने आपल्या कामाच्या व्यापातून आज आवर्जून वेळ काढला. व यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्याने नित्योपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

या शाळेतील एक गुणवंत विद्यार्थिनी आर्या पटाडे हिने दोनच दिवसांपूर्वी आपल्या शिक्षकांना मला सोनेरी पेन हवा असा आग्रह थरला होता.शिवजयंतीला उत्तम भाषण केले तर तिला सोनेरी पेन देणार असे
तिच्या शिक्षकांनी कबूलही केले होते.
मात्र शिवजयंतीच्या दिवशी भाषण स्पर्धा विजेत्यांना दिलेल्या बक्षीसांत वेगळ्या अनेक वेगवेगळ्या वस्तू होत्या परंतू तो सोनेरी पेन मात्र नव्हता.यामुळे ती
जराशी हिरमुसली होती.परंतू आज मुलांच्या जितू दादाने सर्वांनाच सोनेरी पेन देऊन तिलाही आश्चर्याचा धक्का दिला.

img 20260221 wa0013

यावेळी त्याने विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.आर्याने प्रामाणिकपणे शिवजयंतीच्या भाषणाची तयारी केली आणि मनात सोनेरी पेनाची इच्छा ही धरली.व तिला तोच पेन अनपेक्षितपणे मिळाला देखील.हाच धागा पकडून
‘ जर कठोर परिश्रम करताना आपले काम आपण प्रामाणिकपणे करत राहिलो तर यश आणि आनंदाचे क्षण तुम्हाला स्वतःहून शोधत येतील.’
असा विद्यार्थ्यांना संदेश ही विद्यार्थ्याना दिला.

शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी आपल्या स्वरचित आभा एक दिव्य प्रभावळ. हा मागील वर्षी प्रकाशित झालेला काव्यसंग्रह देऊन आपल्या माजी विद्यार्थ्याचे स्वागत केले तर इयत्ता पहिलीतील कु.त्रिशा रणपिसे हिने आभार मानले.

fb img 1771121541695

Related posts

स्वातंत्र्यदिनी असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन !!

Chief Editor

समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंतांचा दिमाखदार गौरव सोहळा संपन्न;आवडीनुसार क्षेत्र निवडा; जीवनात यशस्वीता नक्कीच मिळेल– प्रा.राजीव सावंत

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

Chief Editor

Leave a Comment