सामाजिक

ग्रामपंचायत जवळेचा अभिनव उपक्रम; एकल महिलांसाठी संपन्न झाला हळदी कुंकवाचा समारंभ!!

img 20260209 wa0228

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या जवळे गावात ग्रामपंचायत कार्यालय जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने व गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात प्रथमच एकल महिलांचा हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

img 20260209 wa0230

ग्रामपंचायतच्या वतीने महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विशेषता एकल महिलांचाही हळदीकुंकू समारंभ करण्यात आला. यावेळी सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील आदर्श सरपंच यांनी सांगितले की,महिलांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण हिरावून न घेता अशा कार्यक्रमांमधून येत असतात एकल महिलांनाही या कार्यक्रमात सहभागी करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम सरपंच ताईंनी घडून आणलेल आहे.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ.मनीषा टाव्हरे,सदस्य चंद्रकलाताई गायकवाड, शुभांगीताई खालकर, प्रमिला गावडे, संगीता साबळे, ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, तसेच हरिचंद्र शिंदे, दत्तात्रय लायगुडे, अमोल वाळुंज, अशोक लोखंडे, भूपेंद्र वाळुंज, यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

img 20260209 wa0228

यावेळी त्यांना वाण म्हणून तिळगुळ,पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त कापडी पिशवी व केशर आंब्याचे एक रोप वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांकडून असे कार्यक्रम घेण्यामध्ये सरपंच वृषालीताई नेहमीच आघाडीवर असतात महिला भगिनींकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

img 20260209 wa0225

Related posts

समर्थ मध्ये राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

वाळव्याचा बहुमान सर्वदूर नेणारा कलायात्री : विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी बाजाराच्या माध्यमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे !!

Chief Editor

Leave a Comment