सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता मोहीम शिबिर संपन्न!!

img 20260106 wa0197

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जवळे गावातील पुणे जिल्हा बँकेच्या खातेदारांसाठी,कर्ज धारकांसाठी, आर्थिक व डिजिटल साक्षरता मोहीम शिबिर आयोजित करण्यात आले होते. आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम जवळे या ठिकाणी घेण्यात आला.

यामध्ये ग्राहकांना 1)एटीएम कार्ड 2)क्रेडिट कार्ड
3)मोबाईल बँकिंग
4)पॉज मशीन
5)मायक्रो एटीएम 6)एसएमएस बँकिंग
7)एनी ब्रांच बँकिंग 8)आरटीजीएस
9)एन इ एफ टी तसेच शासकीय विमा योजना यामध्ये
10)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
11)प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
12)अटल पेन्शन विमा योजना तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज योजना यामध्ये 13)शैक्षणिक कर्ज 14)सोनेतारण कर्ज 15)महिला बचत गट कर्ज 16)दुचाकी वाहन कर्ज 17)चार चाकी वाहन कर्ज 18)बळीराजा कर्ज तसेच सहकार मंत्रालयामार्फत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकरण त्याचप्रमाणे 19)मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(CMEGP) 20)पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP) यासंदर्भात माहिती
तालुका समन्वयक शुभम अरगडे यांनी दिली.

img 20260106 wa0197

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब खालकर, विकास सोसायटीचे सचिव सतीश टाव्हरे, उत्तम शिंदे पाटील, चेअरमन संजय वाळुंज, चिंधू साबळे, दत्तात्रय लोखंडे, बाळासाहेब वाळुंज राजाराम शिंदे, गोरक्षनाथ लायगुडे,नौशाद तांबोळी खंडू निघोट चंद्रकांत गावडे,ज्ञानदेव वाळुंज,दिलीप शेळके, दिलीप लोखंडे,अशोक शिंदे, अशोक लोखंडे, दत्तात्रय टाव्हरे, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला बाल आनंद मेळावा !!

Chief Editor

पोलीस पाटील यांची पत्रकाराला कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी,गुन्हा दाखल;अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार !!

Chief Editor

Leave a Comment