सामाजिक

भीमाशंकर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन १२ ऑक्टोबरला !!

1010907248
1010907248

मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते होणार समारंभ; वारकरी संप्रदायातील संत-महंतांची प्रमुख उपस्थिती

पंचनामा प्रतिनिधी पारगाव : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु. (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी २७ वा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा. आ. दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभहस्ते हा समारंभ होणार आहे. वारकरी संप्रदायातील संत, महंत तसेच ह. भ. प. कीर्तनकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे.

नवीन गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजनाच्या माध्यमातून आगामी हंगामासाठी मंगलमय सुरुवात करण्यात येणार आहे.

या समारंभास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.

1011111277

Related posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात संपन्न झाले वृक्षारोपण !!

Chief Editor

पंचनामा विशेष – आठवणीतील माणसे…

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे यांच्या वतीने शिवभक्तांसाठी १२ कॅन भरून मसाला दुधाचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment