
पंचनामा नाशिक प्रतिनिधी : ग्रापलिंग असोसिएशन ऑफ नाशिकच्या वतीने नाशिक मनपा क्षेत्र तसेच उर्वरित जिल्हा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण कार्यशाळा नुकत्याच उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाल्या. दोन्ही कार्यशाळांना एकूण ३६७ खेळाडू तसेच ६८ प्रशिक्षक, पंच व कोच यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा व शहर संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष प्रशिक्षण उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यात ग्रापलिंग खेळाचा प्रसार व प्रचार अधिक व्यापक होण्यास मदत होणार असून, खेळाडूंचे तांत्रिक ज्ञान, कौशल्य व स्पर्धात्मक स्तर उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. कार्यशाळेत नो-गी ग्रापलिंग, कॉम्बॅट ग्रापलिंग व पारंपरिक मल्लयुद्ध या प्रकारांमध्ये सखोल तांत्रिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय पंच प्रशांत बच्छाव, अनिकेत भवर, संदीप बोरसे आणि अक्षय आंबेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

मनपा क्षेत्रातील कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश डोळस, भूषण ओहोळ, एम. जी. नायर, खंडू घुगे, विनायक खैरनार, क्षितिज सातपुते, टायगर सोनवणे, राहुल गाडे, श्रेया मेहेर, राजू जयस्वाल, नितीन जोशी, रोशन नरोटे, महेंद्र साळवे आणि गोविंद साळवे यांनी विशेष सहकार्य केले.
तर उर्वरित जिल्हा क्षेत्रातील कार्यशाळेसाठी चंद्रशेखर पठाडे, अफजल खान, काशीद शेख, शंकर गुरुळे, पृथ्वीराज वडघुले, मयुरेश घुमरे, अक्षय चौधरी, निलेश सदगीर, गौरव खुळे, सागर बोरसे, सिद्धी फटांगरे, तेजस सूर्यवंशी, संकेत परदेशी, ईश्म देशमुख आणि संकल्प शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
मनपा क्षेत्राच्या अध्यक्ष अर्चना देशमुख तसेच उर्वरित जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी व सहभागींचे आभार मानून ग्रापलिंग खेळाच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक शैलेश ढगे, समाजसेवक रोशन आढाव आणि ग्रामीण उपनिरीक्षक दीपक वडगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाशिक जिल्ह्यात ग्रापलिंग खेळाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा, शालेय उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


