सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी !!

1010709430


पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, निरगुडसर, धामणी, लोणी व वडगावपीर येथे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादचा सण उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा केला.
यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गणेशोत्सव व दीपावलीच्या आगाऊ शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला.
वडगावपीर येथे ईद-ए-मिलाद निमित्त पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस हवालदार राजेश उत्तळे, शितल पोखरकर उपस्थित होते.
तसेच हजरत दावल मलिक दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हनिफ मुजावर, नंदूभाई मुजावर, सरदार मुजावर, मस्जीद मुजावर, आसिफ मुजावर, मुबारक मुजावर, मुजम्मीन मुजावर, अमिर मुजावर, अस्लम मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोख्याची परंपरा जपली.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010688861

Related posts

“उंचखडक येथील मुळे भावंडांनी गौरवग्रंथ आणि अभिष्टचिंतन सोहळ्यातून जागवल्या आईच्या आठवणी” !!

Chief Editor

भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड २०२५-२६ गोव्यात संपन्न होणार !!

Chief Editor

शिंगवेत (पारगाव ) येथे पोलिओ लसीकरण उत्साहात !!

Chief Editor

Leave a Comment