सामाजिक

ॲंटी रॅगिंग समितीच्या सदस्यपदी विठ्ठल ढोबळे यांची सलग दुसऱ्यांदा निवड !!

img 20260819 wa0803


पारगाव : पारगाव (भीमाशंकर सहकारी साखर कारखाना), ता. आंबेगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाच्या ॲंटी रॅगिंग समितीच्या सदस्यपदी माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास महामंडळाअंतर्गत ही निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंगपासून संरक्षण मिळावे तसेच सुरक्षित व शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ॲंटी रॅगिंग समिती कार्यरत असते.
या निवडीनंतर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा. ना. दिलीपराव वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव बेंडे व उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी विठ्ठल ढोबळे यांचे अभिनंदन केले.
याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे यांनी माहिती दिली.

1010628821
1010457105

Related posts

प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी;प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांना पालन करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

Chief Editor

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार- उद्योगमंत्री उदय सामंत

Chief Editor

चिमुकल्यांच्या उत्साही प्रवेशाने गजबजल्या शाळेच्या वर्गखोल्या !!

Chief Editor

Leave a Comment