सामाजिक

जिज्ञासा लोकसंचलीत साधन केंद्र मंचर तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

1010310091
1010310093

पंचनामा प्रतिनिधी – प्रतिनिधी समीर गोरडे

महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे अंतर्गत जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र मंचर या संस्थेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा तोरणा सभागृह लांडेवाडी येथे आयोजित करण्यात आली.

1010310091

उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सावित्री बाई फुले व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी
मा.सिद्धाराम माशाळे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार माविम पुणे विभाग पुणे अशोक चव्हाण जिल्हा समन्वय अधिकारी,सतीश भरती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी,प्रशांत साठे व्यवस्थापक कृषी विभाग BOI चाकण,गजेंद्र घाडगे व्यवस्थापक BOI चाकण,बाळासाहेब कुरकुटे BOI नारायणगाव,धोंडीभाऊ पाबळे तंत्रज्ञान व्यवस्थापक शांताबाई येवले सामाजिक कार्यकर्त्या,संचिता अभंग विस्तार अधिकारी शिक्षण विभाग घोडेगाव,ॲड.स्वप्नाली खामकर, डॉ.मेघा गाडे उपस्थित मान्यवर यांनी महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले.तसेच शासकीय योजनांची माहिती सांगितली.

1010310089
1010310087

यावेळी BOI शाखेकडून किलबिल गटाला दहालाख रुपये सखी गटाला सातलाख रुपये लक्ष्मी गटला पाचलाख रुपये कर्ज मंजुरी पत्र वाटप केले तसेच आदर्शगट म्हणून स्वामी समर्थगट निरगुडसर,समृद्धीगट मंचर KGN,अहिल्यादेवी गट अवसरी बु, मैत्री गट मंचर,सावित्रीबाई फुले गट चास तसेच बचत गटातील महिलांच्या उच्च शिक्षित मुलींचा सन्मान या वेळी उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी सेजल डामसे गोहे खुर्द सानिया शेख मंचर, अमृता येवले चास, वैष्णवी कुलकर्णी पारगाव, तेजस्विनी मांजरे पारगाव,सोनाली येवले चास,सुकन्या पोखरकर,स्नेहल जारकड गावडेवाडी या सर्व मुलीचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

संस्थेच्या सचिव सविता गाडे यांनी संस्थेच्या आर्थिक वर्ष २५/२६या आर्थिक वर्षातील खर्च आणि उत्पन्न याचे महिलासमोर वाचन केले.तेराव्या वार्षिक सभेचे अहवाल वाचन कार्यकारिणी ऋतुजा ढोबळे यांनी केले.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधुन महिलांना जुट बॅगचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या उपाध्यक्ष सविता सैद कार्यकारणी,जिज्ञासा CMRC व्यवस्थापक मनिषा जारकड, लेखापाल संदेश पवार,उपजीविका सल्लागार सविता गाडे,सहयोगीनी रीना वायकर,योगिता लोखंडे,भाग्यश्री चासकर बचत गटातील सभासद, संस्थेचा स्टाफ यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

1010310083

मनिषा जारकड यांनी उपस्थित मान्यवर आणि बचत गटातील महिलांचे आभार मानले आणि सभेचा समारोप करण्यात आला.

Related posts

विजय कोल्हापूरे यांचा श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव (खडकी) यांच्या वतीने सन्मान !!

Chief Editor

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत पुणे जिल्ह्यात २८ लाख ६८ हजार २२३ ‘अनकलेक्टेबल’ मतदार !!

Chief Editor

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर !!

Chief Editor

Leave a Comment