सामाजिक

यशाच्या शिखरावर समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स; विद्यापीठ परीक्षेत विद्यार्थ्यांची दैदिप्यमान भरारी !!

1010053696
1010053696

पंचनामा प्रतिनिधी – सातत्यपूर्ण परिश्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीच्या बळावर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह नेत्रदीपक कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. उत्तम शेलार यांनी दिली.
तृतीय वर्ष बी.सी.एस. विभागात कु. पायल लोंढे हिने सी.जी.पी.ए. ९.७४ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली. कु. तनुजा चौधरी व कु. वैभवी हांडे यांनी ९.४५ गुणांसह द्वितीय, कु. श्रद्धा हुलवळे हिने ९.४५ गुणांसह तृतीय, कु. सेजल गाजरे (९.२७), कु. ऋतुजा कोल्हे (९.१७) आणि कु. जागृती ढमाले (९.१६) यांनी अनुक्रमे पुढील क्रमांक मिळवून यशाची परंपरा अधिक समृद्ध केली.
तृतीय वर्ष वाणिज्य विभागात कु. सृष्टी साबळे हिने सी.जी.पी.ए. ९.०४ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. ऋतुजा गवांदे हिने ९.०४ गुणांसह द्वितीय, कु. मिताली लाडके (८.७३) तृतीय, कु. तेजल औटी (८.४८) चतुर्थ, तर कु. साहिल इनामदार (८.३९) यांनी पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशामागे प्रा. गणेश बोरचटे, प्रा. अक्षय वाघ, प्रा. दिनेश जाधव, प्रा. विलास गवरी, डॉ. प्रणाली साळुंके, प्रा. शुभांगी लामखडे, प्रा. विशाखा निचित, प्रा. माधुरी झावरे, प्रा. आशिया चौगुले, प्रा. कल्याणी शेलार, प्रा. दत्तात्रय डंबाळे, प्रा. सीमा दराडे आणि डॉ. शिरीष गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, डॉ. लक्ष्मण घोलप, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“गुणवत्तेचा ध्यास, यशाचा विश्वास” या ब्रीदाला साजेशी कामगिरी करत समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सने पुन्हा एकदा उत्कृष्ट निकालाच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रभावी साक्ष दिली आहे.

Related posts

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे सोमवार दि.२० एप्रिल २०२६ ते बुधवार दि.२२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार जय हनुमान यात्रा उत्सव !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे बाजार संपन्न झाले गाळ्यांचे बांधकामाचे भूमीपूजन !!

Chief Editor

Leave a Comment