
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे येथील प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह-२०२६” मध्ये एकूण १० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.व्हर्चूसो इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स प्रा.लि.पुणे या कंपनीमध्ये खालील विद्यार्थ्यांची निवड झाली.
संकेत ताजवे (E&TC),किशोर भोगाडे (E&TC),श्रीकांत फड (Electrical),यश बोडके (Electrical),श्रद्धा साठे (Electrical),प्रणाली चोरगे (Electrical),पूजा फापळे (Electrical)
तसेच स्नेह प्रिकास्ट & कॉन्स्टो सोल्युशन्स प्रा.लि या कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मधील खालील विद्यार्थ्यांची निवड झाली :
ओंकार पांडुरंग कुर्कुटे,सुयोग दत्तात्रय येवले,देवदत्त गंगाधर भालेराव या निवड प्रक्रियेसाठी व्हर्चुसो कंपनीकडून एच.आर.अँड ऍडमिन एक्झिक्युटिव्ह नहुष मोहोळे व मॅनेजर इंजिनिअरिंग सागर मालवी,तसेच स्नेह प्रिकास्ट कडून टेक्निकल डायरेक्टर मयंक गुप्ता व एच.आर.मॅनेजर ज्ञानेश्वर समुद्रे यांनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या.

मुलाखत प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी तसेच प्रा.दीपाली गाडगे,प्रा.माया गिरी व प्रा.पंकज शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्लेसमेंट यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी व इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा.निलेश नागरे,सिव्हिल विभागप्रमुख प्रा.अमोल भोर तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.


