
मांदळेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील मूळ रहिवासी व लोणी येथील उद्योजिका ज्योती अरुण गोरडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका, युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य घोडेगाव ता.आंबेगाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५ व्या जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणारा, प्रतिष्ठेचा आंबेगाव भूषण स्वामी विवेकानंद उद्योजक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

त्या निमित्त मांदळेवाडी येथे श्री अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कार्यक्रमात ग्रामपंचात व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उज्वला अतूल आदक व उपसरपंच रवि ढगे पाटील यांच्या हस्ते ज्योती अरुण गोरडे यांना सनमानीत करण्यात आले.तसेच भारतीय लष्करातून सेवा निवृत्त झालेले व नूकतीच पुणे शहर पोलीस मध्ये निवड झालेले प्रदिप आदक यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पै.विजय आदक, विकास आदक, रामदास पालेकर पाटील, पै.विश्वनाथ आदक.ज्ञानेश्वर मादळे,अँड.अशोक पालेकर पाटील,पोलीस पाटील काळूराम पालेकर पाटील सर्व भजणी मंडळाचे गायक, वादक व ग्रामस्थ तसेच विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ज्योती गोरडे म्हणाल्या की, आपल्या मतीतील माणसांनी मला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल जो सत्कार केला तो नक्कीच जीवनातील एक मोठी आठवण असून त्यामुळे मला नक्कीच उद्योग क्षेत्रात नवी ऊर्जा मिळेल.

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे ज्योती गोरडे यांना सन्मानीत करताना सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ.



