सामाजिक

समर्थ संकुलात वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर मेजर रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन !!

img 20260101 wa0750


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे आणि सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर, विभाग पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव व मानव यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
वन्यजीव अभ्यासक तथा माजी सैनिक मेजर रमेश खरमाळे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
मेजर रमेश खरमाळे यांनी मानववस्ती आणि जंगल क्षेत्र यांच्यातील सीमारेषा कमी होत असल्यामुळे वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष कसा वाढत आहे,याची कारणे स्पष्ट केली.वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास जपणे,अन्नसाखळीचे संतुलन राखणे आणि मानवी हस्तक्षेप मर्यादित ठेवणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
बिबट्या,तरस,रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांशी सामना झाल्यास घ्यावयाची काळजी,अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे महत्त्व,तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य व सुरक्षित वर्तन कसे असावे याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन मानव व निसर्ग यांच्यात सुसंवाद साधण्यास मदत होईल.कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तसेच शंकांचे सविस्तरपणे व सकारात्मक पद्धतीने समाधान केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रणाली साळुंके यांनी तर आभार प्रा.कीर्ती शिंदे यांनी मानले.

Related posts

तमाशा क्षेत्रातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व मंदाराणी खेडकर !!

Chief Editor

विजय कोल्हापूरे यांचा श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव (खडकी) यांच्या वतीने सन्मान !!

Chief Editor

पंचनामा विशेष – असे तमाशाफड;असे तमाशा व्यवस्थापक – मा.पोपट बेंगारे मामा

Chief Editor

Leave a Comment