
पंचनामा प्रतिनिधी मेंगडेवाडी – श्री गणेश देवस्थान ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र मेंगडेवाडी येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवार (दि. २९) रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांचे कीर्तन होणार आहे.
‘पिंगळा’ फेम ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्यासमवेत महाराष्ट्राचे भजन वैभव ह.भ.प. कैलास महाराज पवार, गायनसम्राट ओंकार महाराज जगताप तसेच परिसरातील मृदंगमणी ह.भ.प. ऋषिकेश महाराज सुक्रे यांची साथ लाभणार आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त आयोजित या कीर्तन सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी, मेंगडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या भाविकांना काही कारणास्तव कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी कीर्तनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यांनीही ऑनलाइन माध्यमातून कीर्तनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


