सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक शाळेला मिळाले टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक !!

img 20260404 wa0561

पंचनामा प्रतिनिधी – टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.

टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.

fb img 1773887068819

पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.

आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.

img 20260404 wa0561

काठापुर बुद्रुक शाळेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related posts

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील रानमळ्यात बिबट्या वावर ? वनविभागाचे दुर्लक्ष !!

Chief Editor

Leave a Comment