सामाजिक

अखेर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या; सोबतीला सोसाट्याचा वारा अन विजांचा कडकडाट !!

1009552090
1009552090

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत सोबतीला विजेचा कडकडाट व सोसाट्याचा वारा असल्याने बळीराजाची मात्र शेतातील पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पहावयास मिळाले.

आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले होते. उन्हाच्या तीव्र उकाड्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला, मका, तसेच इतर उन्हाळी पिके करपत असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

fb img 1774661449199

अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदलामुळे आगामी काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला मातृ पितृ पूजन दिवस!!

Chief Editor

आद्य संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Chief Editor

पोंदेवाडी (ता.आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा येथे बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली पाहणी!!

Chief Editor

Leave a Comment