सामाजिक

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिराच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त भाविकांनी घेतला मासवडी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद !!

img 20260417 wa0552
img 20260417 wa0553

पंचानामा प्रतिनिधी – मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिराच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार ( दिः२४) ते सोमवार (दिः२०मे) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन केले जाते.

चालू वर्षी या सप्ताहचे ३२ वे वर्षे असून,दररोज हरिकिर्तनानंतर महाप्रसाद दिला जातो.चालू वर्षी सप्ताहाच्या चवथ्या दिवशी ग्रामस्थांच्या माध्यमातूनच जवळ-जवळ १२०० ग्रामस्थांना बाजरीची भाकरी व मासवडी जेवनाचे आयोजन केले होते. जवळ-जवळ १५०० बाजरीची भाकरी व मासवडीचे जेवन ग्रामस्थांना दिले गेले.

तसे पाहिले तर हे गाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.दुष्काळग्रस्त गाव म्हणून या गावाची ओळख आहे.पण म्हणता ना ” एकी हेच बळ ” या माध्यमातून आपल्या गावाप्रती असणारी अस्था आणि निष्ठा या गावाने दाखवून दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण उत्तर पूणे जिल्हयात एक आदर्श अखंड हरिनाम सप्ताह म्हणून या गावाला ओळखले जाते.यासाठी संपूर्ण गाव एकजूटीने काम करत असते. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

img 20260417 wa0552

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) महाप्रसादासाठी तयार करण्यात आलेली मासवडी व भाकरी.

fb img 1774661444136

Related posts

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न !!

Chief Editor

शिरदाळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला भेट !!

Chief Editor

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे वृक्षारोपण संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment