सामाजिक

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

img 20260417 wa0352
img 20260417 wa0352

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएससी मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.या परीक्षेत अद्वैत शिंदे याने ९२.४% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.वेदांत चिकणे याने ९०.८% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला,तर श्रेयश डोंगरे याने ९०% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच भक्ती जाधव हिने ८९.६% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला.

महाविद्यालयातील ८०% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे-सृष्टी बांगर ८७.४%,अथर्व भांबेरे ८६%, प्रिया राजदेव ८५%, वेदांत पिंगळे ८४.८%, श्लोक गलांडे ८३.६%, सानिका मटाले ८२.२%,संस्कृती बांगर ८१.८%, श्रावण आग्रे ८१.४%.विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच यशाची परंपरा कायम ठेवावी असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.

या विद्यार्थ्यांना रामचंद्र मते, शीतल पाडेकर,प्रिया कडुस्कर,दीपाली नवले, दत्तात्रय राऊत, अनुराधा इरलीकर, विशाखा शिंदे, वैशाली सहाने, प्रियांका गडगे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

fb img 1774661449199

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ. शरद पारखे,तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related posts

लोणी (धामणी ) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यतीमध्ये धावले ३५० बैलगाडे !!

Chief Editor

हरिनामाच्या गजरात शिंगवे गाव दुमदुमले,आनंदवारी दिंडीने जपली वारकरी परंपरा !!

Chief Editor

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरात सुविधांची पाहणी;दर्शन रांगेत पाणी बॉटलचे वाटप; चंद्रभागेत होडीतून स्वच्छतेची पाहणी, आयसीयूमधील रुग्णांची विचारपूस !!

Chief Editor

Leave a Comment