सामाजिक

समर्थ मध्ये राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न !!

img 20260306 wa0438
img 20260306 wa0439

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे तसेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा २०२५–२०२६ या समर्थ क्रीडा प्रबोधिनी येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडल्या.


स्पर्धेची सुरुवात खासदार डॉ.अमोल कोल्हे व मा.आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले,उपप्राचार्य संजय कंधारे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,क्रीडा संचालक प्रा.हरिश्चंद्र नरसुडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेत १४ झोनमधील १४ संघांनी सहभाग नोंदविला.सौ.सुंदरबाई माणिक आडसुळ तंत्रनिकेतन,चास (अहिल्यानगर),के. जे. सोमय्या तंत्रनिकेतन,मुंबई,सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस (डिप्लोमा),शेगाव (बुलढाणा), सीएसएमएसएस तंत्रनिकेतन महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर,जयहिंद तंत्रनिकेतन,कुरण,श्रीमती गीता डी.तटकरे तंत्रनिकेतन,रायगड,न्यू सातारा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय (तंत्रनिकेतन) पंढरपूर,एमव्हीपीएस राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन,नाशिक,शासकीय तंत्रनिकेतन,कोल्हापूर,कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन,सातारा,सौ.शांतिदेवी चव्हाण तंत्रनिकेतन,चाळीसगाव,बालाघाट तंत्रनिकेतन,रुद्धा (अहमदपूर),राजारामबापू अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था,राजारामनगर (सांगली) व एनआयटी तंत्रनिकेतन,नागपूर या संघांनी सहभाग घेतला.

img 20260306 wa0441

कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीमती गीता डी.तटकरे तंत्रनिकेतन,रायगड (A1 विभाग) यांनी विजेतेपद पटकावले,तर के. जे. सोमय्या तंत्रनिकेतन,मुंबई (A2 विभाग) यांनी उपविजेतेपद मिळविले.

खो-खो स्पर्धेत १४ झोनमधील १२ संघ सहभागी झाले.राजारामबापू तंत्रनिकेतन पुणे,शासकीय तंत्रनिकेतन मुंबई,एमआयटी तंत्रनिकेतन रोटेगाव (वैजापूर),शासकीय तंत्रनिकेतन कराड, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर, श्रीमती गीता डी. तटकरे तंत्रनिकेतन, रायगड, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतन,शासकीय तंत्रनिकेतन,यवतमाळ,शासकीय तंत्रनिकेतन नांदेड,एसएसव्हीपीएस बी.एस. देवरे तंत्रनिकेतन धुळे,शासकीय तंत्रनिकेतन,पुणे व कर्मयोगी तंत्रनिकेतन,पंढरपूर या संघांनी सहभाग घेतला.

खो-खो स्पर्धेत श्रीमती गीता डी. तटकरे तंत्रनिकेतन,रायगड (A1 विभाग) यांनी विजेतेपद मिळविले,तर कर्मयोगी तंत्रनिकेतन,पंढरपूर (C विभाग) यांनी उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संजय कंधारे,प्रा.ईश्वर कोरडे,डॉ.नंदकिशोर मुऱ्हेकर,क्रीडा शिक्षक सुरेश काकडे,विनायक वऱ्हाडी तसेच यांनी विशेष परिश्रम घेतले.

img 20260306 wa0132

विजेते व उपविजेते खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

fb img 1771121534243

Related posts

लेण्याद्री येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

Chief Editor

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment