सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!

img 20260126 wa0424

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जवळे ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांच्या शुभ हस्ते व एकल महिला यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. सरपंच यांनी एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहन करून एकल महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य केलेला आहे.

सर्व जवळे ग्रामस्थांना,भारतीयांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.ग्रामपंचायतचे सर्व स्तरामधून कौतुक करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे चेअरमन संजय वाळुंज व्हा.चेअरमन व जवळे ग्रामस्थांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले.

img 20260126 wa0424

गावामध्ये नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यामध्ये जवळे ग्रामपंचायत तालुक्यामध्ये आघाडीवरती आहे.जवळे ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतलेला असून गावामध्ये सर्व समावेशक अशी भूमिका सरपंच यांची राहिलेले आहे यातूनच गावचा चेहरा मोहरा बदलून खऱ्या अर्थाने विकास साधण्याचे काम अविरत सुरू आहे.

यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच मनीषा टाव्हारे, हरिचंद्र शिंदे, शुभांगी खालकर, प्रमिला गावडे, संगीता साबळे, ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांच्यासह गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,सर्व विद्यार्थी, महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बेंढरी सर यांनी केले.

img 20260126 wa0427

Related posts

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

भैरवनाथ विद्याधाम लोणी (धामणी) येथे शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत संपन्न होणार विविध शालेय उपक्रम!!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी कौशल्य विकास योजने अंतर्गत आरी प्रशिक्षण संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment